Jammu Kashmir | जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, शाळेत घुसून गोळीबार

| Updated on: Oct 07, 2021 | 2:03 PM

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील एका ईदगाहवर गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील एका ईदगाहवर गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या शिक्षकांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यातील एक पुरुष शिक्षक असून ते एक काश्मिरी पंडित आहेत. सध्या ते बटामालू श्रीनगरमध्ये वास्तव्याला होते. त्यांची ओळख दीपक चंद म्हणून पटवण्यात आली आहे.

दुसरा मृत व्यक्ती ही महिला शिक्षिक आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्या महिलेची ओखळही पटवण्यात आली आहे. त्या अलोची बाग श्रीनगरच्या रहिवासी होत्या. आरपी सिंहची पत्नी सतिदनेर कौर अशी मृत शिक्षिकेची ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्यता दरम्यान दहशतवाद्यांनी श्रीनगर जिल्ह्यातील संगम ईदगाह परिसरात दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून दहशतवाद्यांचा शोध सुरु केलाय.

IT Raid | आयकर विभागाची 5 साखर कारखान्यांवर धाड, जरंडेश्वर कारखान्याचाही समावेश
Jayant Patil | धाडी टाकून आमच्या नेत्यांची बदनामी, हे भाजपचं षडयंत्र : जयंत पाटील