Pravin Darekar | नारायण राणेंच्या अटकेनंतरही जनआशीर्वाद यात्रा सुरु राहणार : प्रवीण दरेकर

| Updated on: Aug 24, 2021 | 6:53 PM

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहील, अशी माहिती दिली आहे. राणे यांच्या अनुपस्थितीत ही जनआशीर्वाद यात्रा सुरु राहणार आहे.   

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटल्यानंतर राणे यांना अटक करण्यात आलंय. या अटकेनंतर आता भाजप नेते राज्य सरकारवर टीका करत आहेत. या अटकेबाबत बोलताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहील, अशी माहिती दिली आहे. राणे यांच्या अनुपस्थितीत जनआशीर्वाद यात्रा सुरु राहणार आहे.

Ulhasnagar | उल्हासनगरात भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना काळं फासलं
Narayan Rane Arrest | नारायण राणेंवर केलेली कारवाई बेकायदेशीर, नारायण राणेंच्या वकिलांचा दावा