जपान एअरलाईन्सच्या विमानाचा बर्निंग थरार, विमानात 300 हून अधिक प्रवासी अन्… भडकली आग

| Updated on: Jan 02, 2024 | 5:09 PM

टोकियो विमानतळावर विमानाचं लँडिंग होत असताना विमानाला अचानक भीषण आग लागली. सध्या सोशल मीडियावर जपान एअरलाईन्सच्या विमानाचा बर्निंग थरार व्हायरल होत आहे. जपान एअरलाईन्सच्या विमानाला जसा वणवा पेटावा तशी आग खालच्या बाजूने पसरली

टोकियो, २ जानेवारी २०२४ : टोकियो विमानतळावर विमानाचं लँडिंग होत असताना विमानाला अचानक भीषण आग लागली. सध्या सोशल मीडियावर जपान एअरलाईन्सच्या विमानाचा बर्निंग थरार व्हायरल होत आहे. जपान एअरलाईन्सच्या विमानाला जसा वणवा पेटावा तशी आग खालच्या बाजूने पसरली. ही घटना टोकियोच्या हानेडा या विमानतळावर घडली. या घटनेनंतर विमानतळ प्रशासन सतर्क होत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले आणि या आगीवर ताबा मिळवण्यात यश आले. ही आग विमान रनवेवर लँड होत असताना लागली असल्याचे वृत्त आहे. तर कोस्ट गार्डच्या विमानाला धडक बसल्याने जपान एअरलाईन्सच्या विमानाला भीषण आग लागली. दरम्यान, या विमानात 300 हून अधित प्रवासी होते, मात्र त्यांना सुदैवाने सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Published on: Jan 02, 2024 05:09 PM
… अन् फर्नांडीस कुटुंबाच्या संघर्षाचा विजय, अंजली दमानिया यांचा काय होता भुजबळांवर गंभीर आरोप?
अयोध्येतील रामलल्लासाठी 7 दिवस 7 अनोखे पोशाख, श्रीरामाचं अंगवस्त्र बनवण्याचा मान कुणाला?