सरकारला वेळ किती अन् कशासाठी पाहिजे? जरांगे पाटील यांचा सरकारला थेट सवाल

| Updated on: Nov 01, 2023 | 3:26 PM

सरकारला वेळ किती आणि कशासाठी पाहिजे? सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे सांगाव. सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा झाली? त्याचा तपशील जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

Follow us on

जालना, १ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय बैठक पार पडली यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सरकारला वेळ किती आणि कशासाठी पाहिजे? सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का? हे सांगाव. सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा झाली? त्याचा तपशील जाणून घेण्याची अजिबात इच्छा नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. गोरगरीबाच्या लेकरावर गुन्हे दाखल करण्याचं काम सरकारकडून विनाकारण सुरु आहे. तुमच्याबद्दल एखादा शब्द वाईट बोललं तर तुम्हाला वाईट वाटतंय. आरक्षण द्या अरे-तुरे बोलणं बंद करतो. तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला वेळ कशासाठी पाहिजे, का पाहिजे? तुम्ही मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? हे सांगा. तुमच्या मनात काय आहे? हे कळू दे. मराठा समाज दगाफटका करणारा नाही. आमच्याकडून खोट नाटं वधवून घेऊ नका, असे जरांगे म्हणाले. सरकारचा अध्यादेश आम्हाला मान्य नाही तो रद्द करावा, अशी मागणी करत जरांगे पाटील यांनी वेळ घेऊन सरसकट आरक्षण देणार का? असा सवाल सरकारला केला आहे. तर आम्हाला अर्धवट आरक्षण नको. आरक्षण मिळेपर्यंत आमच आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही पाटील यांनी सरकारला सांगितले आहे.