शिंदे सरकारच्या वायद्याची डेडलाईन हुकणार? २५ ऑक्टोबरपासून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार?
tv9 Marathi Special Report | शिंदे-फडणवीस सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे पुढच्या २ दिवसात मराठा आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर पुन्हा उपोषणाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला सबुरीचं आश्वासन दिलंय.
मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३ | सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे पुढच्या २ दिवसात निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला सबुरीचं आश्वासन दिलंय. सरकारनं दिलेल्या वायद्याप्रमाणे निर्णय न झाल्यास 25 तारखेपासून जरांगे पाटलांनी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. त्यामुळे २४ तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास पुढची भूमिका काय असेल हे जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय. आमरण उपोषणाबरोबर कोणत्याही राजकीय नेत्यांना गावात प्रवेश न देण्याची भूमिका मराठा आंदोलकांनी घेतलीय.दरम्यान एकीकडे मराठा आंदोलकांना दिलेली मुदत संपत आली आहे आणि दुसरीकडे सरकारनं वर्तमानपत्रात दिलेली EWS आरक्षणाची जाहिरातही चर्चेत आहे. वास्तविक हे आरक्षण काही वर्षांपूर्वीच खुल्या वर्गातल्या आर्थिक दुर्बल घटकांना दिलं गेलंय. मात्र त्या आरक्षणामुळे मराठा समाजाला किती फायदा झाला., याची जाहिरात आज छापून आल्यानं सरकार नेमकं काय सुचवू पाहतंय. याची चर्चा होत आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट