Sambhaji Bhide Guruji : संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?

Sambhaji Bhide Guruji : संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?

| Updated on: Apr 15, 2025 | 6:41 PM

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सोमवारी एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. सांगलीतील माळी गल्ली परिसरात ही घटना घडली. दरम्यान, आता संभाजी भिडे यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. सांगलीमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. संभाजी भिडे हे एका धारकऱ्याच्या घरी भोजनाच्या कार्यक्रमासाठी जात असताना माळी गल्ली परिसरात एका भटक्या कुत्र्याने गुरूजींच्या पायाला चावा घेतला. यानंतर संभाजी भिडे यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अशातच आता महापालिकेचे कर्मचारी सांगलीतील माळीगल्लीमध्ये पोहोचले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून आता गल्लीतील सर्व भटकी कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू असताना उल्हासनगर मधील अॅडव्होकेट जय गायकवाड यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

संभाजी भिडे गुरूजी यांच्यावर ज्या कुत्र्याने हल्ला केला त्या कुत्र्याला दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करणार असल्याचे अॅडव्होकेट जय गायकवाड म्हणाले. ‘संभाजी भिडे यांना जो कुत्रा चावला आहे, त्याला मी दत्तक घेणार तसंच त्या कुत्र्याची संपूर्ण काळजी आम्ही स्वतः घेणार आहे. भिडेंना चावलेला कुत्रा नागरिकांना जर सापडला तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. यानंतर स्वराज्य संघटनेकडून त्या नागरिकाचा मोठा सत्कार देखील आम्ही करू’, अशी माहिती जय गायकवाड यांनी दिली आहे

Published on: Apr 15, 2025 06:41 PM
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो… आता 1500 नाहीतर फक्त 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या, ‘सरकारकडून एप्रिल फूल…’
Ladki Bahin Yojana : ‘या’ महिलांना आता 1500 नाही तर 800 रूपयांचा हफ्ता येणार, लाडक्या बहिणींनो तुम्ही तर नाही ना यात? बघा…