Ahmednagar | अहमदनगरमध्ये जयंत पाटील यांच्याकडून निलेश लंकेंच्या कामाचं कौतुक
निलेश लंके विधानसभेत अतिशय उत्तम काम करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये कोणीतरी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक करतंय, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अहमदनगरला पारनेर तालुक्यातील सूप येथे रात्री साडेअकरा वाजता पूल आणि रस्त्याचं उद्घाटन केलंय. यावेळी जयंत पाटलांनी पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून झालेल्या वादावर देखील भाष्य केलं. निलेश लंके विधानसभेत अतिशय उत्तम काम करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये कोणीतरी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक करतंय, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावलाय. तसेच या गोष्टी राजकारणात होत असतात असं नमूद करत काही लोकांना मर्यादा सोडून वागण्याची सवय असते, मात्र प्रत्येकाने मर्यादित राहून काम करायचं असतं असा सल्लाही दिला.