मुख्यमंत्री कोणाचा होणार? महायुती, मविआ की…? CM पदावरून मित्रपक्षांमध्ये दावे-प्रतिदावे सुरु

| Updated on: Oct 02, 2024 | 11:37 AM

आगामी विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहे. अशातच सर्वच राजकीय पक्षांनी आणि नेते मंडळींनी आगामी विधानसभा लक्षात घेऊन त्याप्रकारे मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर दावे-प्रतिदावे सुरू झालेत.

Follow us on

राज्याचा मुख्यमंत्री कोणाचा होणार? याबद्दल महाविकास आघाडी, महायुतीसह मित्र पक्षांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भविष्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री मविआचाच होणार असल्याचं उत्तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिलं. महायुतीबरोबरच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण होणार? यावरून प्रामुख्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात दावे-प्रतिदावे कायम आहेत. तर आगामी निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याचा दावा करत पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचं विधान केले आहे. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदावरील दाव्याची खिल्ली उडवत मुख्यमंत्री महायुतीचा होणार असल्याचा दावा भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शहाजीबापू पाटील यांनी एकनाथ शिंदे हे पुढचे मुख्यमंत्री ठरलेले आहे, असे विधान केल्याचे पाहायला मिळाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट