द काश्मीर फाईल्स इंटर्व्हलनंतर फार बोअरिंग सिनेमा- जयंत पाटील
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांच्यात आज विधानसभेत द काश्मीर फाईल्स (the kashmir files) सिनेमावरून शाब्दिक कोटी रंगली.
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांच्यात आज विधानसभेत द काश्मीर फाईल्स (the kashmir files) सिनेमावरून शाब्दिक कोटी रंगली. देवेंद्र फडणवीस यांनी डंके की चोटपर सांगतो काल आम्ही सर्वजण द काश्मीर फाईल्स हा सिनेमा बघायला गेलो होतो. त्यामुळे विधानसभेत नव्हतो, असं स्पष्ट केलं. त्यावर जयंत पाटील यांनी फडणवीसांची फिरकी घेतली. ‘काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा मध्यांतरानंतर बोअरींग आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही. फक्त निर्मात्याकडे 160 कोटी जमा झाले आहेत. त्यातून काश्मीर पंडितांना घर बांधण्यासाठी दान करायला सांगा, अशी मागणी जयंत पाटील यांनी आज सभागृहात केली. त्यामुळे भाजप सदस्यांनी गोंधळास एकच सुरुवात केली.
Published on: Mar 23, 2022 01:57 PM