मार्ग कसा काढायचा यासाठी विरोधीपक्षाने सरकारला मदत करणे अपेक्षित मात्र… – Jayant Patil
या भीषण पूरपरिस्थितीतून मार्ग कसा काढायचा यासाठी विरोधीपक्षाने सरकारला मदत करणे अपेक्षित आहे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात परवापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. चिपळूणमध्ये सुद्धा पाऊस पडला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळं संकट निर्माण झालं आहे यातून मार्ग कसा काढायचा या साठी विरोधीपक्षाने सरकारला मदत केली पाहिजे. पण ते आता टीका करत असतील तर राजकारण कोण करत आहे हे समजते, असं जयंत पाटील म्हणाले. केद्रं सरकारने किती मदत केली हे माहित नाही पण नक्कीचं केद्रं सरकार मदत करेल, असं जंयत पाटील म्हणाले. जयंत पाटील यांनी सांगलीच्या शिरगावमध्ये बोटीतून पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान, या भीषण पूरपरिस्थितीतून मार्ग कसा काढायचा यासाठी विरोधीपक्षाने सरकारला मदत करणे अपेक्षित आहे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
(Jayant Patil says Opposition is expected to help the government to find a way to save Maharashtra)