Jayant Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला साताऱ्यात का बसला फटका? जयंत पाटलांनी सांगितलं पराभवाचं मोठं कारण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निवडून आलेल्या खासदारांचं अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तर ज्या ठिकाणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाची कारणंही जयंत पाटील यांनी सांगितले.
सातारा लोकसभा मतदारसंघातून झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांचा दणदणीत विजय झाला असून त्यांनी शशिकांत शिंदे यांचा ३२ हजार २१७ मतांनी पराभव केला. दरम्यान, साताऱ्यात उदयनराजे आणि शशिकांत शिंदे मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. पहिल्या फेरीपासून पहिल्या पंधरा फेऱ्यांमध्ये शशिकांत शिंदे यांचे मताधिक्य वाढत होतं. मात्र पंधराव्या फेरीनंतर उदयनराजे यांनी आघाडी घेत शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निवडून आलेल्या खासदारांचं अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तर ज्या ठिकाणी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यांच्या पराभवाची कारणंही जयंत पाटील यांनी सांगितले. ‘आमची अनेक मते पिपाणीला गेले आहेत. दिंडोरीत एक लाखाहून अधिक मतं पिपाणीला गेले आहेत.पिपाणीचे नाव तुतारी असल्याने लोकांचा गैरसमज झाला. आम्ही यानंतर याला ऑब्जेक्शन घेणार आहे. पिपाणीला साताऱ्यात मते गेले त्यामुळे साताऱ्यात आम्हाला फटका बसला आहे. निवडणूक आयोगाला ही गोष्ट निदर्शनास आणून देणार आहोत.’ असे त्यांनी सांगितले.