महादेव जानकर यांच्यासारखीच राजू शेट्टींबद्दल मविआला शंका? काय म्हणाले जयंत पाटील?

| Updated on: Mar 27, 2024 | 12:58 PM

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणारे महादेव जानकर हे दोन दिवसापूर्वीच महायुतीत आले. आता स्वाभिमानीच्या राजू शेट्टींवरून जयंत पाटील यांनी शंका निर्माण केली. राजू शेट्टी यांचा वेगळा पवित्रा दिसत असून ते महाविकास आघाडीसोबत न आल्यास....

महाविकास आघाडीशी जवळीक साधून महादेव जानकर महायुतीतच परतले. अशीच शंका जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याबद्दल व्यक्त केली आहे. राजू शेट्टी यांची भूमिका वेगळी दिसतेय, असे जयंत पाटील म्हणाले. तर आपण महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, असे राजू शेट्टी म्हणाले आणि त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणारे महादेव जानकर हे दोन दिवसापूर्वीच महायुतीत आले. आता स्वाभिमानीच्या राजू शेट्टींवरून जयंत पाटील यांनी शंका निर्माण केली. राजू शेट्टी यांचा वेगळा पवित्रा दिसत असून ते महाविकास आघाडीसोबत न आल्यास ते हातकणंगलेमधून मविआचा उमेदवार द्यावा लागेल, असा इशाराच जयंत पाटील यांनी दिलाय. २०१५ पासून भाजप विरोधात भूमिका घेतली असून आपण भाजप सोबत जाणार नाही, हे राजू शेट्टींनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी आपण महाविकास आघाडीतही जाणार नाही. पण त्यांनी पाठिंबा जाहीर केल्यास घेणार असही राजू शेट्टी यांनी म्हटले.

Published on: Mar 27, 2024 12:58 PM
भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, रक्षा खडसेंसोबत भाजप समर्थकांची बाचाबाची, व्हिडीओ व्हायरल
ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, ‘हे’ 17 उमेदवार लढणार लोकसभा