मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ देणार नाही – जयंत पाटील
सध्या शासकीय परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यावर मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून परीक्षा पारदर्शी पद्धतीने झाल्या पाहिजे यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई : सध्या शासकीय परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यावर मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, एमपीएससीला सगळ्या परीक्षा घेता येणे शक्य नाही म्हणून हा वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला. एजन्सीला या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जाते. दोन दिवसापूर्वी गृहनिर्माण विभागाची म्हाडाची परीक्षा होती. त्यात आरोग्य विभागात ज्यांनी असा गोंधळ घातला त्यांच्या मागावर पोलीस असताना ही माहिती कळली. याबाबत शंका आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये, परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
Published on: Dec 18, 2021 10:45 AM