भूमिका केली म्हणजे समर्थन केले असे नाही, जयंत पाटलांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण
राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांचे समर्थन होताना दिसत आहे. अमोल कोल्हे यांनी एखाद्या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेंची भूमिका साकारली म्हणजे ते त्या विचारधारेचे समर्थन करतात असे होत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमात नथुराम गोडसेंची भूमिका साकारली आहे. कोल्हेंच्या या भुमिकेवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. अमोल कोल्हे यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांनी या चित्रपटाचे चित्रिकरण 2017 मध्ये पूर्ण केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या चित्रपटावरून वाद निर्माण झाल्यावर आता राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांचे समर्थन होताना दिसत आहे. अमोल कोल्हे यांनी एखाद्या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेंची भूमिका साकारली म्हणजे ते त्या विचारधारेचे समर्थन करतात असे होत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.