‘अटक करायची तर मला करा…’, जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

| Updated on: Oct 27, 2024 | 1:30 PM

गुन्हा दाखल होताच जयश्री थोरात आक्रमक झाल्यात. जयश्री थोरातांसह अनेक महिला एकत्र आल्यात. राजकीय दबावाचा वापर करून आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. सर्व सामान्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेत पण मी घाबरत नाही. पोलिसांनी मला अगोदर अटक करावी, असं जयश्री थोरात म्हणाल्या आहेत.

Follow us on

भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेत बोलताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. संगमनेरमध्ये महिला नेत्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. याप्रकरणी थोरातांचे समर्थक आक्रमक झाले त्यांनी सुजय विखेंच्या गाड्यांची तोडफोड केली. वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना हे केलेलं आंदोलन आचारसंहितेचा भंग असल्याचे म्हणत जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. आचारसंहिता असताना जमाव बंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय. तर जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जयश्री थोरात यांच्यासह इतर 50 जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर जयश्री थोरात यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बघा काय म्हणाल्या…