Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यानं सोडली साथ अन्…
VIDEO | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी केलेलं वक्तव्य चांगलं त्यांच्या अंगाशी आलं आहे. भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावरून जरांगे पाटलांनी भुजबळांना टार्गेटही केले होते. असे असले तरी भुजबळांच्या मराठा समर्थकांमध्ये चलबिचल सुरू झाल्याचे पाहायला मिळतंय
नाशिक, २१ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना ओबीसीचे जेष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी मराठा आरक्षण प्रश्नी छगन भुजबळ यांची साथ सोडली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जयदत्त होळकर यांनी छगन भुजबळ यांची साथ सोडल्याने भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत. जयदत्त होळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सरचिटणीस तसेच निफाड तालुका पूर्व 46 गाव तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांनी दिला आहे. तर या पुढे आता फक्त मराठा समाजासाठी काम करण्याची भूमिका घेतली असल्याचे होळकर यांनी म्हटले आहे.
Published on: Oct 21, 2023 04:08 PM