पुणे म्हणजे नादचं खुळा! नव वधू-वराची JCB मधून थेट जंगी मिरवणूक, बघा व्हिडीओ

| Updated on: Feb 28, 2023 | 6:14 PM

VIDEO | आलिशान गाडी, रथावरून लग्नाची मिरवणूक तुम्ही पाहिली असेल पण JCB मधून कोणी लग्नाची मिरवणूक काढल्याचे तुम्ही ऐकलंय का? मग नक्की हा बघा व्हिडीओ

पुणे : प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे त्याचा विवाह सोहळा. या विवाह सोहळ्यातील प्रत्येक क्षण कायमस्वरूपी लक्षात रहावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. लग्नाची मिरवणूक म्हणजे आलिशान गाडी किंवा रथावरून मिरवणूक आपण पाहिली असेल मात्र आपल्या मुलाच्या लग्नाची मिरवणूक एका जेसीबी चालकाने चक्क जेसीबीच्या बकेटमध्ये बसून काढली आहे. जुन्नर तालुक्यातील खोडद येथील महेश गायकवाड यांच्या मुलाचा नुकताच विवाह झाला, गायकवाड यांनी नवरा-नवरीला जेसीबीच्या बकेटमध्ये बसवून या बकेटला सजावट करून या लग्नाची मिरवणूक संपूर्ण गावातून काढल्याने या लग्नात जेसीबीचीचं मोठी चर्चा होताना दिसतेय. या जेसीबीच्या बकेटला रंगबेरंगी फुलांना आणि फुग्यांनी सजवट केली होती. बघा ही ग्रँड मिरवणूक…

शेकापच्या बड्या नेत्यानं हाती घेतलं भाजपचं कमळ, पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले…
शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेऊ नये म्हणून हालचाली सुरू, ठाकरे गटाकडून कोणता नवा प्लान?