Jet Airways चे संस्थापक नरेश गोयल ED च्या अटकेत, ‘या’ तारखेपर्यंत ईडी कोठडी

| Updated on: Sep 02, 2023 | 11:17 PM

VIDEO | Jet Airways चे संस्थापक नरेश गोयल यांच्याविरोधात ईडीकडून मोठी कारवाई, नरेश गोयल यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 11 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई, २ सप्टेंबर २०२३ | जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीने काल अटक केली आहे. त्यांच्यावर 538 कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अटक करण्यापूर्वी काल त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं दरम्यान, नरेश गोयल यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 11 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी 5 मे रोजी नरेश गोयल यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयासह सात ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. 74 वर्षीय नरेश गोयल यांनी मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं. ईडीने नरेश गोयल यांच्या कोठडीची मागणी केली. कॅनरा बँकेत 538 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता आणि कंपनीच्या काही अधिकाऱ्यांवर आरोप आहे. 1 हजार 410 कोटी रुपये कंपनीने कमिशन स्वरुपात पैसे परदेशात पाठवण्याचाही आरोप आहे. बँकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

Published on: Sep 02, 2023 11:14 PM
रोहित पवार यांचा त्रागा, ‘मी फालतू राजकारणात आलो’, ‘पैशाची मस्ती आणि सत्तेचा घमंड आलाय…’
जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर शरद पवार रूग्णालयात, बघा tv9 Special Report