Ulhasnagar | उल्हासनगरात ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडत दागिन्यांची चोरी

| Updated on: Nov 23, 2021 | 4:19 PM

ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडत चोरी (Robbery At Jewellery Shop) झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) घडली आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडालीये. यात तीन ते चार किलो चांदी आणि काही सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता.

ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडत चोरी (Robbery At Jewellery Shop) झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) घडली आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडालीये. यात तीन ते चार किलो चांदी आणि काही सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. या चोरीच्या तपासासाठी पोलिसांची तीन पथकं तयार करण्यात आली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प 1 परिसरात शिवशक्ती ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. या ज्वेलर्सच्या मागच्या बाजूच्या भिंतीला भगदाड पाडत चोरट्यांनी दागिने चोरले आहेत. यात तीन ते चार किलो चांदी आणि काही सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. या दुकानाचे मालक बाहेरगावी गेले असून हीच संधी साधत चोरट्यांनी दुकानात चोरी केली. त्यामुळे चोरट्यांनी दुकानावर पाळत ठेवून नियोजन करुन ही चोरी केल्याची शक्यता आहे. या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

Pritam Munde | ‘कसं वाजवायचं आहे तसं वाजवा’; प्रीतम मुंढे पत्रकारांवर भडकल्या
Deepak Kesarkar| माझ्यावर टीका केल्याशिवाय राणेंचे राजकारण पूर्ण होत नाही- केसरकर