Jharkhand : झारखंडमध्ये त्रिकूट रोपवेचा अपघात, NDRF कडून बचावकार्य सुरू

| Updated on: Apr 11, 2022 | 1:55 PM

झारखंडमध्ये (Jharkhand) झालेल्या त्रिकूट रोपवेच्या (Ropeway) अपघातात 48 जण वीस तासांपासून अडकले आहेत. तर अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना लष्कराला अडचणी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.

झारखंडमध्ये (Jharkhand) झालेल्या त्रिकूट रोपवेच्या (Ropeway) अपघातात 48 जण वीस तासांपासून अडकले आहेत. तर अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना लष्कराला अडचणी असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. झारखंडचा सर्वात उंच रोपवे आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता त्रिकूट रोपवे ट्रॉली एकमेकांवर आदळली. त्यामुळे लोक टेकडीवर अडकले आहेत. एनडीआरएफने (NDRF) रात्री उशिरापासूनच बचावकार्य सुरू केले. यानंतर लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत लोकांना सुखरूप परत आणता आले नाही. झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृ्त्यू आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Kirit Somaiya प्रकरणात पडल्यास राजभवनाची उरलेली इज्जतही जाईल – Sanjay Raut यांचा घणाघात
राज ठाकरेंच्या भेटीनंतर काय म्हणाले वसंत मोरे?