Mumbai | जितेन गजारियांनी रश्मी ठाकरेंबाबत केलेलं ट्वीट कायद्याच्या चौकटीत : गजारीयांचे वकिल

| Updated on: Jan 06, 2022 | 3:59 PM

रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजप पदाधिकारी ताब्यात घेण्यात आला आहे. जितेन गजारिया असं ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या अधिवेशनातही रश्मी ठाकरे चर्चेत आल्या होत्या, कारण मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून चंद्रकांत पाटील यांनी कोपरखळ्या मारल्या होत्या.

रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजप पदाधिकारी ताब्यात घेण्यात आला आहे. जितेन गजारिया असं ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या अधिवेशनातही रश्मी ठाकरे चर्चेत आल्या होत्या, कारण मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून चंद्रकांत पाटील यांनी कोपरखळ्या मारल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीचा मुद्दा गेल्या अधिवेशनात खूपच चर्चेत राहिला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी वाटून द्यावी असे सल्ले देताना दिसून आले, तर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्र्यांना मुलावर विश्वास नसेल तर त्यांनी रश्मी वहिनींना चार्ज द्यावा, अशा कोपरखिळ्या मारताना दिसून आले, त्यानंतर आता हेच प्रकरण राजकारण तापवताना दिसतंय. जितेन गजारिया ने मराठी राबडी देवी असे ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीवरून सातत्याने भाजपकडून टीका केली जात आहे. या ट्विटवरून शिवसेनेच्या महिला नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उडवली आहे. भाजप असे कारखाने चालवते, अशी माणसं भाजपने पगार देऊन ठेवली आहेत, अशी टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली आहे. रश्मी ठाकरे कुणाच्या आध्यात ना मध्यात असतात, मात्र त्यांच्यावर अशी टीका होणे निंदनीय आहे, अशा भावना आता शिवसेनेच्या महिला नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

Mumbai | रश्मी ठाकरेंबाबत केलेल्या ट्वीट प्रकरणावर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांची प्रतिक्रिया
Narendra Modi at Punjab | हिच ती जागा, जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जिवंत परतले’!