जितेंद्र आव्हाडांनी कॅमेऱ्यासमोर मुंब्र्याच्या पीआयला फोन लावला आणि...
jitendra awhad

जितेंद्र आव्हाडांनी कॅमेऱ्यासमोर मुंब्र्याच्या पीआयला फोन लावला आणि…

| Updated on: Nov 11, 2023 | 3:48 PM

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं एक ट्विट खूप चर्चेत आहे.उद्धव ठाकरेंच्या भेट देण्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापलं. मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्ज फाडण्यात आले. उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येऊच देणार नाही, असं पोलिसांनी म्हटल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुब्र्यातील घटनेवरून जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर निशाणा साधलाय. TV9 मराठीशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी मुंब्र्याच्या PI ला फोन लावला आणि...

मुंबई, 11 नोव्हेंबर 2023 | मुंब्रा येथील ठाकरे गटाची शाखा पाडण्यात आली त्या ठिकाणी आज उद्धव ठाकरे भेट देणार आहेत त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे सर्व नेते उपस्थित असणार आहेत. मुंब्र्यातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवल्यानंतर मुंब्र्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या शाखेची पाहणी करण्यासाठी आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुंब्र्यात येणार आहेत. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे मुब्र्यासाठी रवाना होतायत. यासंदर्भातील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं एक ट्विट खूप चर्चेत आहे.उद्धव ठाकरेंच्या भेट देण्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापलं. मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले होर्डिंग्ज फाडण्यात आले. उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येऊच देणार नाही, असं पोलिसांनी म्हटल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुब्र्यातील घटनेवरून जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर निशाणा साधलाय. TV9 मराठीशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी मुंब्र्याच्या PI ला फोन लावला आणि ते फोन उचलत नसल्याचं दाखवलं. पोलिसांची काही ऐकण्याची सुद्धा मानसिकता नसल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांवर निशाणा साधला.

Published on: Nov 11, 2023 03:48 PM
मनसे दीपोत्सव! विकी कौशलचं कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले…
अबब! झेंडू, पिवळा झेंडू, शेवंती…मागच्या वर्षीच्या तुलनेत एका क्रेटची किंमत तर पहा