वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा सवाल; ‘मुघलांशिवाय शिवरायांचा इतिहास कसा ते समजावून सांगा?’
छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधान भोवणार जितेंद्र आव्हाडांना भोवणार? वादग्रस्त वक्तव्यानंतर दिले स्पष्टीकरण, काय म्हणाले?
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केले आहे. हे विधान आव्हाड यांना चांगलेच भोवणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, मुघलांशिवाय छत्रपती शिवरायांचा इतिहास कसा समजावून सांगणार? मला समजावून सांगा छत्रपती शिवरायांची युद्ध निती कशी होती? छत्रपती शिवरायांनी पावनखिंड कशी जिंकली? इतर किल्ले कसे जिंकले? छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाचं दरबारात काय झालं? वादग्रस्त वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अनेक सवाल उपस्थित करत स्पष्टीकरण दिले आहे.