Jitendra Awhad | म्हाडाचा पेपर फुटला नाही, त्याआधीच कारवाई झाली : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad | म्हाडाचा पेपर फुटला नाही, त्याआधीच कारवाई झाली : जितेंद्र आव्हाड

| Updated on: Dec 12, 2021 | 5:12 PM

काल रात्री पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले, त्यांच्या संभाषणात पेपरफुटीचा उल्लेख होता. महाराष्ट्रमधील सर्व दलाल एकच आहेत, खाजगी सवस्थेकडून हा प्रकार झाला, त्यामुळे यापुढे म्हाडा परीक्षा घेणार, खासगी संस्थेकडे देणार नाही अशीही माहिती त्यांनी दिली.

ठाणे : म्हाडा पेपरफुटी प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, पोलिसांनी त्या टोळीचा पर्दाफाश केला, अशी माहिती त्यांनी दिली आहे. भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात जी टोळी कार्यरत आहे, ती उध्वस्त करायला लागेल, यात पेपरफुटी नाही तर गोपनियतेचा भंग झाला आहे. असेही ते म्हणाले आहेत. काल रात्री पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले, त्यांच्या संभाषणात पेपरफुटीचा उल्लेख होता. महाराष्ट्रमधील सर्व दलाल एकच आहेत, खाजगी संस्थेकडून हा प्रकार झाला, त्यामुळे यापुढे म्हाडा परीक्षा घेणार, खासगी संस्थेकडे देणार नाही अशीही माहिती त्यांनी दिली. ज्यांच्याकडून फी घेतली आहे, त्यांची फी म्हाडा परत करणार आहे. काही नालायक लोकांना थारा देऊ नये. ही परीक्षा झाली असती तर काहींवर अन्याय झाला असता. विद्यार्थ्यांचे हीत जवळचे आहे त्यामुळे मोठे रॅकेट पकडायला डिपार्टमेंट मागे लागले आहे, तसेच वशिल्यासाठी काही लोक मंत्रालयात येतात, मागच्या सरकारवेळीही एमपीएसीचा पेपर फुटला, असंही ते म्हणाले आहेत.

Narayan Rane | महाविकास आघाडी सरकारने राज्याला 10 वर्षे मागे नेलं : नारायण राणे
Pune | पेपर लीक केल्याप्रकरणी तिघांना अटक, पुणे सायबर सेलची कारवाई