Jitendra Awhad | भाजपला सत्तेचा माज हा लखीमपूर घटनेमधून दिसतोय – जितेंद्र आव्हाड

| Updated on: Oct 11, 2021 | 5:04 PM

भारतीय जनता पक्षाला सत्तेचा माज आहे, हे लखीमपूर घटनेमधून (lakhimpur kheri case) दिसतेय, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे. या बंदमध्ये लोकांचा स्वेच्छेने सहभाग घेतला आहे असा दावा मविआ नेते करत आहेत. तर आजचा बंद हा पूर्णपणे फसला आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 9 ऑक्टोबर रोजी तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, भाजपला सत्तेचा माज आहे, हे लखीमपूर घटनेमधून दिसतेय, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

Nana Patole | शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याची भूमिका नाही : नाना पटोले
Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM | 11 October 2021