‘त्या’ साडेतीन शहाण्यांना आव्हान देण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त निवडला, राऊतांचा रोख कुणावर?
सध्या राज्याच्या राजकारणात साडेतीन शहाणे आहेत. असे म्हणत राऊत म्हणाले, महाविकास आघाडी आणि आमच्या घटक पक्षात कोणतेही वाद नाहीत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एकजूट दिसून येईल, ती एकजूट कायम राहिल. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली
आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी राज्यातील साडेतील शहाण्यांना आव्हान देण्यासाठीच हा साडेतीन मुहूर्तापैकी आजचा दिवस निवडला, असे म्हणत संजय राऊत यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. सध्या राज्याच्या राजकारणात साडेतीन शहाणे आहेत. असे म्हणत राऊत म्हणाले, महाविकास आघाडी आणि आमच्या घटक पक्षात कोणतेही वाद नाहीत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एकजूट दिसून येईल, ती एकजूट कायम राहिल, तसेच महाविकास आघाडी राज्यात लोकसभेच्या ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वासही व्यक्त केला. काही लोकांचे मिशन ४८ पैकी ४८ किंवा ४५ पेक्षा अधिकच्या घोषणा करत आहे, असा टोला लगावत आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला. बघा संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Published on: Apr 09, 2024 05:26 PM