देशातील परिवर्तनासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा
तेलंगणा राज्यनिर्मितीसाठी ज्या शरद पवारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे त्यांना भेटणे आणि त्यांचे मार्गदर्शन घेणे हे आमचे कर्तव्य आहे.
तेलंगणा राज्यनिर्मितीसाठी ज्या शरद पवारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे त्यांना भेटणे आणि त्यांचे मार्गदर्शन घेणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे पुढील काळात देशातील परिवर्तनासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा असे मत के. चंद्रशेखर राव यांनी मत व्यक्त केले. शरद पवारांच्या यांच्या भेटीनंतर देशातील राजकारणाची पुढची दिशा ठरवली जाईल. कारण ते राजकारणाती एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांनी समविचारी पक्षांना मार्गदर्शन करावे यासाठी आता भेट झाली आहे. यानंतर देशाच्या विकासासाठी काय करता येईल, राजकारणाची दिशा काय असेल हे ठरवण्यासाठी लवकरच आम्ही समविचारी पक्षांची बैठक घेऊन आम्ही आमची दिशा ठरवणार आहोत असे के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.