भंडाऱ्यात खासदार महोत्सवात कबड्डी स्पर्धा, MP Sunil Mendhe यांचा कबड्डीचा डाव

भंडाऱ्यात खासदार महोत्सवात कबड्डी स्पर्धा, MP Sunil Mendhe यांचा कबड्डीचा डाव

| Updated on: Mar 13, 2022 | 10:28 AM

मंत्री, नेते मंडळी कबड्डीच्या (Kabaddi) आखाड्यात उतरतात व्हा चर्चा रंगतेच. राजकीय मैदान गाजवणाऱ्यांना मैदानी खेळ जमणार का, राजकीय डावपेच खेळणाऱ्यांना मैदानी डावपेच जमणार का. या दृष्टीनं त्यावेळी बघितलं जातं.

भंडारा : मंत्री, नेते मंडळी कबड्डीच्या (Kabaddi) आखाड्यात उतरतात व्हा चर्चा रंगतेच. राजकीय मैदान गाजवणाऱ्यांना मैदानी खेळ जमणार का, राजकीय डावपेच खेळणाऱ्यांना मैदानी डावपेच जमणार का. या दृष्टीनं त्यावेळी बघितलं जातं. यापूर्वी देखील अनेक आमदार, खासदार, मंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी कबड्डीच्या आखाड्यात उतरुन आपल्या कौशल्याची झलक दाखवली आहे. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. भंडारा (Bhandara) जिल्ह्यतील खासदार सुनील मेंढे (BJP MP Sunil Mendhe) यांचा हा व्हिडीओ आहे. भंडारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भाजप खासदार सुनील मेंढे यांनी महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या महोत्सवात कबड्डी हा लोकप्रिय मैदानी खेळ देखील आहे. खासदार सुनील मेंढे यांचा याच महोत्सवातील कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ व्हायर (viral video) होतोय. यामध्ये ते कबड्डी खेळताना दिसतायेत. आता खासदार महोदय कबड्डीच्या आखाड्यात उतरणार तर चर्चा होणारच की.

लोकांना आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नसतो : Ajit Pawar
Sharad Pawar यांच्यावर टीका केल्याप्रकरणी Nitesh Rane आणि Nilesh Rane यांच्यावर गुन्हा दाखल