VIDEO : Pandharpur मधील विठ्ठल मंदिरातील काकड आरती स्पीकरविना होणार

| Updated on: May 05, 2022 | 12:11 PM

राज ठाकरेंच्या भोंगा मुद्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मशिदीवरील भोंगे बंद ठेवण्याबाबत मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मात्र, आता मनसेच्या या भूमिकेमुळे पंढरपुरमधील विठ्ठल मंदिरातील काकड आरती स्पीकरविनाच होणार आहे. यामुळे आता भाविकांमध्ये देखील नाराजगी आहे. 

राज ठाकरेंच्या भोंगा मुद्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मशिदीवरील भोंगे बंद ठेवण्याबाबत मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मात्र, आता मनसेच्या या भूमिकेमुळे पंढरपुरमधील विठ्ठल मंदिरातील काकड आरती स्पीकरविनाच होणार आहे. यामुळे आता भाविकांमध्ये देखील नाराजगी आहे. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत साईबाबा संस्थानला जिल्हा पोलिस प्रशासनाने स्पीकर लावण्याकरीता परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन आरतीचा स्वर बंद झाला आहे. स्पीकरविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. आज पहाटे झालेल्या काकड आरतीवेळी आवाज येत नसल्याने भाविकांमध्ये कमालीचा संभ्रम पहायला मिळाला.

 

 

Published on: May 05, 2022 12:11 PM
VIDEO : Ajit Pawar | ‘सरकार अल्टिमेटमवर नाही;कायद्यावर चालतं’;अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं
VIDEO : Ajit Pawar on Elections | खोटी सर्टिफिकेट आणुन निवडणुका लढवल्या