डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार शिवसेनेचं धनुष्यबाण

| Updated on: Apr 30, 2024 | 5:33 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचारसभांचा धुराळा उडत असताना डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटातील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय. डोंबिवली शहरप्रमुखच हाती घेणार शिवसेनेचं धनुष्यबाण

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. तर अजूनही लोकसभेच्या तीन टप्प्यांसाठीचं मतदान बाकी आहे. एकीकडे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचारसभांचा धुराळा उडत असताना डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडल्याचे समोर आले आहे. ठाकरे गटातील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे लवकरच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे डोंबिवलीमधील महत्त्वाचे, प्रतिष्ठित आणि मोठे स्थानिक पदाधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत धनुष्यबाण हाती घेताना दिसणार आहेत. ठाकरे गटाचे शहरप्रमुख विवेक खामकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, डोंबिवलीत शिवसेनेच्या दोन्ही गटाचे उमेदवार आमने-सामने असून शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Published on: Apr 30, 2024 05:33 PM
महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची माझ्याविरोधात… ओमराजे निंबाळकरांचा पंतप्रधानांवर निशाणा