अंगभर गुलाल… शब्द अडखळले… डोळ्यात अश्रू; विजयानंतर भावूक झालेले श्रीकांत शिंदे पाहिले का?
गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षाचे दोन गट झालेत. त्यामुळे राज्यात १३ ठिकाणी शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेगवार वैशाली दरेकर या श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उभ्या होत्या.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेली. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षाचे दोन गट झालेत. त्यामुळे राज्यात १३ ठिकाणी शिवसेना विरूद्ध शिवसेना असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. या मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेगवार वैशाली दरेकर या श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उभ्या होत्या. या अटीतटीच्या लढाईत एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून ४ लाख ३९ हजार ९६६ मतं पडली तर वैशाली दरेकर यांना २ लाख ३४ हजार ४८८ मतं पडली. जवळपास २ लाख मतांनी श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. या विजयानंतर श्रीकांत शिंदे हे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीकांत शिंदे यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला.