माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण… सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे... कारण माणसाने खंडीभर खावं मांडीला मांडी लावून कसं खावं हेच श्रीकांत शिंदे कडून शिकावे फार चांगली कला आहे, असे म्हणत खोचक वक्तव्य त्यांनी केलं. पुढे त्या असेही म्हणाल्या, ठेकेदार एमएमआरडी सर्व प्रकारचे एजन्सी माझ्याकडे पाहिजे. मी सर्व अधिकाऱ्यांना धंदा...
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची अंबरनाथ येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर चांगलाच हल्लाबोल केला. सुषमा अंधार यांनी यावेळी श्रीकांत शिंदे यांच्यावर बोलताना म्हटलं… माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे… कारण माणसाने खंडीभर खावं मांडीला मांडी लावून कसं खावं हेच श्रीकांत शिंदे कडून शिकावे फार चांगली कला आहे, असे म्हणत खोचक वक्तव्य त्यांनी केलं. पुढे त्या असेही म्हणाल्या, ठेकेदार एमएमआरडी सर्व प्रकारचे एजन्सी माझ्याकडे पाहिजे. मी सर्व अधिकाऱ्यांना धंदा लावला पाहिजे सर्व अधिकाऱ्यांना मी रुबाब सांगितलं पाहिजे. अशा प्रकारचं राजकारण मोडीत काढत दडपशाहीमुळे एक कॉन्ट्रॅक्टर जातो, असं त्यांनी म्हटलं. दहा वर्षापासून खासदार इथं आहे. दहा वर्षात सांगतात हा एमएमआरडीचा निधी केंद्राचा? खरंच केंद्रामध्ये यांचं चालतं का? असा सवाल करत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर हल्ला चढवला.