‘तुमको जगह पर लाऊंगा, मराठी लोक भिकारडे अन् घाण…’; कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला रॉडने जबर मारहाण
'मराठी लोक भिकारडे आणि चिकन-मटण खावून घाण करणारे' अशी शेरेबाजी केल्याने किरकोळ कारणावरून जाब विचारल्याने ही जबर मारहाण मराठी कुटुंबाला करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईत पुन्हा एकदा मराठी कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याचे समोर आले. ‘मराठी लोक भिकारडे आणि चिकन-मटण खावून घाण करणारे’ अशी शेरेबाजी केल्याने किरकोळ कारणावरून जाब विचारल्याने ही जबर मारहाण मराठी कुटुंबाला करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. कल्याण पश्चिम येथील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये अमराठी कटुंबात किरकोळ भांडण सुरू होतं. हे भांडण मिटवण्यासाठी शेजारे राहणारे मराठी कुटुंबातील व्यक्ती धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला. तर त्यावेळी अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात, असं तिने म्हटलं. इतकंच नाहीतर चिकन मटण खावून घाण करणारे तुम्ही मराठी लोकं आहात, अशी शेरेबाजी केल्याने वाद सुरू झाला हा वाद वेगळ्या मार्गाला लागला. यानंतर अमराठी कुटुंबाने बाहेरुन माणसं मागवून मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यामध्ये शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने केलेल्या वारामुळे एका तरूणाला डोक्यावर १० टाके पडल्याची माहिती आहे. मेरी सीएम ऑफिस मैं पेहचान, तुमको जगह पर लाऊंगा असं म्हणत दमदाटी केली. कल्याण पश्चिमेतील योगिधाम परिसरातील आजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी रात्री घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. धूप आणि अगरबत्ती लावल्यावरून सुरू झालेला किरकोळ वादाने गंभीर स्वरूप धारण केलं आणि मराठी कुटुंबाला हिंसाचारात ओढून नेला गेला.