Kalyan Rain Update : कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; ‘या’ महामार्गावरील वाहतूक ठप्प

| Updated on: Jul 14, 2024 | 5:55 PM

कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हासनदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने सुरक्षेसाठी कल्याण नगर मार्गावरील रायता पूल पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. रस्ता बंद केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. उल्हासनदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता...

कल्याण नगर महामार्गवर गुडघावर पाणी साचलं आहे. कल्याण म्हारळ गाव ते वरप गाव दरम्यान महामार्गावर गुडघ्यावर पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर अहमदनगर मार्गावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. एकीकडे उल्हास नदीची पाण्याच्या पातळीत वाढ़ झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने नगर मार्गावरील रायते नदीचा पूल पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हासनदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने सुरक्षेसाठी कल्याण नगर मार्गावरील रायता पूल पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. रस्ता बंद केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. उल्हासनदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने कल्याण नगर मार्गावरील रायता पूल पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केल्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. कल्याणला येण्यासाठी गोवेली टिटवाळा मार्गे मार्गक्रमण करण्याचे कल्याण तालुका पोलीसांनी आवाहन केले आहे.

Published on: Jul 14, 2024 05:55 PM