MSRTC ST Employees Strike : ‘लालपरी’ला आजपासून ब्रेक, कल्याण-विठ्ठलवाडी आगाराचे कर्मचारी संपावर; मागण्या काय?

| Updated on: Sep 03, 2024 | 12:07 PM

Kalyan VithalWadi MSRTC ST employees Strike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक मिळावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे

Follow us on

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असताना राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्यभरात एसटी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. यामुळे राज्यभरातील लालपरीला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळतंय. एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. तसेच एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात लालपरीने आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होणार आहेत. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे.