पुण्यातील कमान जलाशय ओव्हरफ्लो, भीमा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; नागरिकांना धास्ती
VIDEO | पुण्यातील कमान जलाशय ओव्हरफ्लो, पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात येणार
पुणे, 29 जुलै 2023 | पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर परिसरातील घाटमाथ्यावर पाऊसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे चास कमान जलाशय ओव्हरफ्लो होऊन 3 हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरु करण्यात आला आहे. डोंगरद-यामधून वाहणारे ओढे, नाले आणि भीमानदी दुथडीभरुन वाहत चास कमान धरणात येत आहे. त्यामुळे चास कमान जलाशय ओव्हरफ्लो झाला आहे. चारही बाजुने डोंगराच्या कुशीतला निसर्गरम्य परिसरातील जलाशय ओव्हरफ्लो होऊन 3 हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग भीमानदी पात्रात सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे भीमानदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. चास कमान जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने खेड आणि शिरुर तालुक्यासाठी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे.
Published on: Jul 29, 2023 09:42 AM