WITT Global Summit : हीच योग्य वेळ… कंगना राणावत लोकसभा निवडणूक लढवणार? मनात होतं ते जाहीरपणे मांडलं
कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत देखील त्याचा एक भाग होती. यावेळी कंगना राणावतला लोकसभा निवडणुकीसंदर्भात सवाल करण्यात आला. यावर तिने दिलखुलास संवाद साधत भाष्य केले
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2024 : टीव्ही 9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिटमध्ये दुसऱ्या दिवशी अनेक दिग्गजांनी भाग घेतला. समिटमध्ये सहभागी झालेल्या दिग्गजांनी राजकारणापासून खेळापर्यंत आणि व्यवसायापासून ते तंत्रज्ञानापर्यंतच्या विषयांवर आपली दिलखुलास मते मांडली. कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत देखील त्याचा एक भाग होती. यावेळी कंगना राणावतला लोकसभा निवडणुकीसंदर्भात सवाल करण्यात आला. यावर तिने दिलखुलास संवाद साधत भाष्य केले. ‘मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पण खरे सांगायचे तर मला लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर हीच योग्य वेळ असल्याचं म्हणत कंगना राणावतने सूचक व्यक्तव्य केले आहे. कंगनाच्या या वक्तव्याने देशभरात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. तर कंगना राणावतच्या या वक्तव्यामुळे तिला स्वत: ला निवडणूक लढण्याची इच्छा आहे, असं जाहीरपणे बोलून दाखवलं. टीव्ही9 नेटवर्कने व्हॉट इंडिया थिंक्स टुडे या कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं होतं. यावेळी कंगना राणावतची मुलाखत घेण्यात आली. यावेळी तिने ही रोखठोक भूमिका व्यक्त केली.