Kanhaiya Kumar | ज्यांना देश विकायचा आहे त्यांनी भाजपमध्ये जावं : कन्हैया कुमार

| Updated on: Dec 09, 2021 | 11:44 PM

"मी पंतप्रधानांसारखा नापास झालो नाही. माझं मार्कशीट पाहू शकता. देशातील एक व्यक्ती अर्ध्या रात्री येऊन टीव्हीवर काही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भलं होणार आहे", अशा शब्दात काँग्रेस नेता कन्हैया कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोपानिमित्त पुणे काँग्रेसच्या वतीनं कन्हैया कुमारच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

“मी पंतप्रधानांसारखा नापास झालो नाही. माझं मार्कशीट पाहू शकता. देशातील एक व्यक्ती अर्ध्या रात्री येऊन टीव्हीवर काही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भलं होणार आहे”, अशा शब्दात काँग्रेस नेता कन्हैया कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या समारोपानिमित्त पुणे काँग्रेसच्या वतीनं कन्हैया कुमारच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार मोहन जोशी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे आदी नेते उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आणि तलावर देऊन कन्हैया कुमारचा सत्कार करण्यात आला.

देशाच्या नावावर मित्रांचं भलं करण्याचं काम सुरु आहे. आतापर्यंत कधीड डिझेल 100 रुपये लिटर झालं नाही. महागाई आकाशाला पोहोचली आहे. गांधींजींची हत्या करणारे लोक आज देश विकायला निघाले आहेत. पंतप्रधान म्हणजे देश आहे का? पंतप्रधानांबद्दल काही बोललं की देशद्रोही ठरवलं जातं. जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय ते कसं समजणार? असा खोचक सवालही कन्हैया कुमारने विचारलाय. सध्या व्हॉट्सअपवर देशाबद्दल काहीही बोललं जात आहे. यांना वाटतं कुणावरही यूएपीए लावू, बोलती बंद करु, पण साहेब हा भारत आहे, असंही कन्हैया कुमारने ठणकावून सांगितलं.

Special Report | शब्दभांडार असणाऱ्या संजय राऊतांकडे दुसरा शब्द नव्हता?
Nagpur Election | विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये आलो नव्हतो : छोटू भोयर