काकानं केलं पुतण्याचं तोंडभरून कौतुक, भरसभेत अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. एक अजित पवार यांचा गट आणि दुसरा शरद पवार यांचा गट. यानंतर अजित पवार यांच्या गटातील नेत आणि शरद पवार यांच्या गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसताय. मात्र अशातच अजित पवार यांनी रोहित पवार यांचेच कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.
कर्जत- जामखेडध्ये रोहित पवारांचं उत्तम कामस सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे कौतुक करण्यात आले आहे. बारामतीतील एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी रोहित पवार यांचं कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. ‘राजकारणाची गोडी होती म्हणून मी आलो. शरद पवार यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली. त्यानंतर सुप्रिया सुळेंना देखील वाटलं राजकारण या क्षेत्रात यावं. अशापद्धतीने गेल्या टर्ममध्ये रोहित पवार पण राजकारणात उतरले. रोहित पवार यांना म्हटलं. तू इथे पुणे जिल्ह्यात नको तू आपलं जवळच्या नगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडमध्ये जा, नाहीतर लोकं म्हणतील यांच्याशिवाय दुसरं कोणी दिसतंय की नाही. पण त्यांला कर्जत जामखेडमध्ये पाठवलं त्याने तिथे चांगलं काम केलं आणि सुरू आहे’, असे अजित पवार म्हणाले. बघा व्हिडीओ काय म्हणाले अजित पवार?