Karnataka Election Result | कर्नाटकात अब की बार कुणाचं सरकार? मराठी नेत्यांच्या आवाहनाला मतदार प्रतिसाद देणार?

| Updated on: May 13, 2023 | 8:02 AM

VIDEO | बेळगावातील ६ मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समिती रिंगणात, सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार बाजी मारणार?

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत या निवडणुकीचे कल हाती येतील. तर विशेष म्हणजे कर्नाटकात अब की बार कुणाचं सरकार येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार बाजी मारणार का हे चित्र अवघ्या काही तासात निश्चित होईल. कर्नाटकतील बेळगावात 6 मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समिती रिंगणात आहेत. बेळगाव उत्तर, दक्षिण ग्रामीण मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यासह यमकनर्डी, निपाणी, खानापुरात तगडी फाईट असणार आहे. कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरता मराठी नेत्यांनी आवाहन केलं होतं. या नेत्यांच्या आव्हानाला मतदार कसा प्रतिसाद देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Published on: May 13, 2023 08:02 AM
पवारांच्या आत्मचरित्रात भाजप आणि फडणवीसांबाबत काय? ज्यामुळे रंगलं वाकयुद्ध?
निकालाचा पत्ताच नाही! मात्र काँग्रेसमध्ये वाद आणि रस्सीखेच सुरु? काय आहे नेमकं कारण?