Big Breaking : आता नोकऱ्यांमध्ये 100 % आरक्षण, खासगी कंपन्यांमधील ‘या’ पदांसाठी स्थानिकांना प्राधान्य
कर्नाटकात राहणाऱ्या नागरिकांना म्हणजेच स्थानिकांना खाजगी क्षेत्रात १०० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांमधील क आणि ड वर्गातील नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षण स्थानिकांना दिले जाणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासंदर्भात माहिती दिली
कर्नाटक सरकारकडून आता स्थानिकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकात राहणाऱ्या नागरिकांना म्हणजेच स्थानिकांना खाजगी क्षेत्रात १०० टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांमधील क आणि ड वर्गातील नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षण स्थानिकांना दिले जाणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने कन्नड लोकांना खाजगी क्षेत्रातील गट क आणि ड पदांमध्ये १०० टक्के आरक्षण लागू करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. तर कर्नाटक मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकमधील सरकार कन्नड समर्थक आहे. त्यामुळे कन्नड लोकांच्या हिताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असल्याचं सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. नोकऱ्यांपासून कन्नड लोकं वंचित राहू नये, अशी सरकारची इच्छा आहे.
Published on: Jul 17, 2024 05:34 PM