Karnataka Election Result | सरकार स्थापनेसाठी काँग्रेसला जेडीएसची साथ घ्यावी लागणार ?

| Updated on: May 13, 2023 | 10:35 AM

VIDEO | कर्नाटकात सध्या किंगमेकरच्या भूमिकेत कुमारस्वामी, काँग्रेससोबत जाणार की भाजपसोबत जाणार?

कर्नाटक : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Election Result) कल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपला काँग्रेसने मागे टाकत पहिल्या टप्प्यातील कलामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं आहे. काँग्रेसने 115 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला अवघ्या 79 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर सध्या भाजप 80, काँग्रेस 106, जेडीएस 33 आणि इतर 4 असा निकाल हाती येत आहे. कर्नटकात हे आकडे पाहिले तर तिथे त्रिशंकू आवस्था पाहायला मिळत आहेत आणि यासर्वांमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत कुमारस्वामी आहेत. यानंतर आता कुमारस्वामी कोणता निर्णय घेतात, ते काँग्रेससोबत जातात की भाजपसोबत जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, 2006 मध्ये कुमारस्वामी यांनी भाजप सोबत सत्ता स्थापन केली होती तर 2018 मध्ये त्यांनी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली होती आणि मुख्यमंत्रीपदावरही ते विराजमान झाले होते. त्यामुळे सध्याच्या कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर कुमारस्वामी कोणता निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: May 13, 2023 10:35 AM
Karnataka Assembly Election Result : काँग्रेसने घेतली ‘ऑपरेशन कमळ’ची धास्ती! हालचालींना वेग, सर्व आमदारांना बोलावलं बंगळूरला!
कर्नाटक विधानसभा निकालाचे कल जाहीर होताच संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…