Special Report | हिजाबचा वाद थांबणार कधी? हात कापण्याची भाषा
कर्नाटकातील हिजाबवरून सुरू झालेला वाद आता थांबताना दिसत नाही. हा वाद महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून आंदोलन करुन या कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे.
कर्नाटकातील हिजाबवरून सुरू झालेला वाद आता थांबताना दिसत नाही. हा वाद महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून आंदोलन करुन या कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात येत आहे. हा वाद आता उत्तर प्रदेशमध्येही जाऊन पोहचला आहे, तेथील समाजवादी पक्षाच्या रुबिना खानम यांनी तर हात कापण्याची भाषा केली आहे. आमच्या हिजाबवर कुणी हात घालत असेल तर आम्ही झाशीची राणी बनून त्याला उत्तर देऊ असेही त्यांना म्हटले आहे. तर मुंबईतील एम पी शाह कॉलेजमध्येही बंदी घालून विद्यार्थ्यांना युनिफार्ममध्येच येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत रईस शेख यांनी गृहमंत्र्याना पत्र लिहिले आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी बुरखा बंदी घालण्यात आल्याचे प्राचार्यांनी सांगितले आहे. हिजाबवरुन उदगीर, कल्याण आणि जळगावमध्येही जोरदार आंदोलन करण्यात आले आहे