Karuna Sharma Video : दिशा सालियन प्रकरणात करूणा शर्मा यांची उडी, ‘त्या’ प्रकरणाचा उल्लेख करत केली मोठी मागणी

| Updated on: Mar 20, 2025 | 3:35 PM

करुणा शर्मा यांनी दिशा सालियनप्रमाणे पूजा चव्हाणला न्याय देण्याची मागणी करत असताना ज्याप्रमाणे दिशा सालियनसाठी न्याय मागताय त्याप्रमाणे पूजा चव्हाणला पण न्याय द्या आणि सीबीआय चौकशी लावा, असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.

दिवंगत अभिनेत सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन प्रकरणावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. गेल्या पाच वर्षीचं प्रकरण आज पुन्हा एकदा चर्चेत आल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याप्रकरणासंदर्भात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. यानंतर आदित्य ठाकरे यांना तात्काळ अटक करण्याची मागणी सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत केली. अशातच करूणा शर्मा यांची एक पोस्ट व्हायरल होतेय. ‘दिशा सालियनसाठी न्याय मागताय त्याप्रमाणे पूजा चव्हाणला पण न्याय द्या’, अशी मागणी करूणा शर्मा यांनी केली आहे. इतकंच नाहीतर सीबीआय चौकशी लावा, अशी मागणी देखील करूणा शर्मा यांनी दिशा सालियन प्रकरणावर बोलताना केली आहे. करुणा शर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये दिशा सालियनप्रमाणे पूजा चव्हाण हिला न्याय देण्याची मागणी केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्याशी संबंधित पूजा चव्हाण हे प्रकरण आहे. महाविकास आघाडीच्या काळात या पूजा चव्हाण प्रकरणावरुन संजय राठोड यांना आपलं पद सोडून राजीनामा द्यावा लागला होता. मात्र आता करुणा शर्मा यांनी याच प्रकरणाचा उल्लेख केला. त्यामुळे पूजा चव्हाण हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

Published on: Mar 20, 2025 03:35 PM
Aditya Thackeray : सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?
Chitra Wagh Video : ‘ओ अनिल परब, हिंमत आहे तुमच्यात…आम्हाला हलक्यात घेऊ नका’; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या