Karuna Sharma Video : ‘फक्त सहा महिने…’, धनंजय मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा खळबळजनक दावा

| Updated on: Mar 21, 2025 | 12:40 PM

जास्तीत जास्त सहा महिने नाहीतर नऊ दहा महिने या नंतर धनंजय मुंडे यांच्या आमदारकीचा राजीनामा होणार असल्याचे करूणा शर्मा यांनी म्हटले आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यासंदर्भात करूणा शर्मा यांनी एक नवा दावा केला आहे. धनंजय मुंडेंच्या आमदारकी संदर्भात बोलताना करूणा शर्मा म्हणाल्या, ‘फक्त सहा महिने किंवा जास्तीत जास्त नऊ-दहा महिन्यांत धनंजय मुंडे यांच्या आमदारकीचा राजीनामा होणार’ असं वक्तव्य करत करूणा शर्मा यांनी थेट भविष्यवाणीच केल्याचे पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यासंदर्भात टीव्ही ९ मराठीशी बोलताना करूणा शर्मा म्हणाल्या, छत्रपती संभाजीनगर कोर्टात आमदारकी रद्द होण्याची केस सुरू आहे. लवकरात लवकर त्याच्यावरही सुनावणी होणार आहे. धनंजय मुंडे यांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांनी जे खोटं ॲफेडेव्हिट दिलं आहे, त्यासाठी परळीमध्ये केस दाखल केली असून त्यांनी खोटी माहिती दिली असल्याचे करूणा शर्मांनी यावेळी म्हटले. तर त्या केस मध्ये चार तारखेला परत सुनावणी होणार आहे. जास्तीत जास्त सहा महिने नाहीतर नऊ दहा महिने नंतर धनंजय मुंडे यांचा आमदारकीचा राजीनामा होईल, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

Published on: Mar 21, 2025 12:40 PM
Sanjay Raut : पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान केक खाऊन येतात, त्यावर आक्षेप का नाही? राऊतांचा खणखणीत टोला
Supriya Sule Video : ‘…हा सरकारचा खोटानाटा खेळ’, जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा घणाघात