पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही? काय म्हणाले विजय वडेट्टीवार
पायंडा फक्त आम्ही पाळायचा असं होऊ शकत नाही, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली भूमिका
नागपूर : कसबा पेठ पोट निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजपकडून प्रयत्न केले जात आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मविआला याबाबत विनंती केली आहे. मात्र यावर काँग्रेसची नेमकी भूमिका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली आहे. कसबा आणि पिंपरी चिंचवड संदर्भात काँग्रेसची भूमिका प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांसमोर मांडली आहे. बिनविरोड केवळ पिंपरी चिंचवड आणि कसबा कशाला महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुका बघितल्या तर फक्त मुंबई वगळता भाजपने आपले उमेदवार उभे केले होते. तर इतर बाकीच्या निवडणुका बिनविरोध करता आल्या असत्या, आम्ही त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना तिकीट देऊन त्या कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढणार आहे, असे आवाहन केले होते. तरीही भाजपने प्रतिसाद दिला नव्हता. केवळ अंधेरीमध्ये त्यांना पराभव दिसत होता, त्यामुळे त्यांनी तिथे पाठिंबा दिला.
मात्र पिंपरी चिंचवड आणि कसबा या दोन्ही पोटनिवडणुका आहेत, त्या संदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते पायंडा म्हणतात मात्र पायंडा फक्त आम्ही पाळायचा असं होऊ शकत नाही. तर कसबा पेठमध्ये त्यांच्या कुटुंबात सुद्धा उमेदवारी दिली नाही, त्यामुळे या निवडणुका बिनविरोध निवडणुका होणे शक्य नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.