कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला कशेडी बोगदा आता बंद, काय कारण?

| Updated on: Oct 01, 2023 | 2:39 PM

VIDOE | मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आला होता. आता हा बोगदा वाहतुकीसाठी काही दिवस बंद राहणार आहे. या बोगद्याच्या मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे 'इतक्या' दिवस या बोगद्यातील वाहतुकीला लागणार ब्रेक

रत्नागिरी, १ ऑक्टोबर २०२३ | कोकणात येणाऱ्या गणेश भक्तांसाठी खुला करण्यात आलेला मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा आता वाहतुकीसाठी काही दिवस बंद असणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोकणात गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी पाहता मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटतील बोगदा वन वे सुरू करण्यात आला होता. त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा मार्ग हा सुखकर झाला होता. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. मात्र हा बोगदा सुरू झाल्यामुळे अवघ्या काही मिनिटांत हा बोगदा कोकणात येणाऱ्या प्रवाशांना पार करता आला. दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-यांसाठी हा मार्ग खुला होता, मात्र परतीच्या प्रवाशांसाठी हा मार्ग आता बंद होता. या बोगद्याच्या मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आलेला हा कशेडा बोगदा वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलाय.

Published on: Oct 01, 2023 02:39 PM
‘मला आदू बाळ म्हटलं याचा मला अभिमान कारण…’, आदित्य ठाकरे यांचं भाजपला प्रत्युत्तर
Vande Bharat Express : वंदेभारत एक्सप्रेसची सुसाट सफाई, अवघ्या १४ मिनिटांत पूर्ण ट्रेन होणार एकदम चकाचक