KDCC Bank Chairman : कोल्हापूर जिल्हा बँकेची धुरा कुणाकडं? हसन मुश्रीफ की पी.एन.पाटील

| Updated on: Jan 20, 2022 | 11:01 AM

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार पी.एन पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर, उपाध्यक्षपदासाठी आमदार राजीव आवळे आणि श्रुतिका काटकर यांची नाव चर्चेत आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पॅनेलनं विजय मिळवला आहे. त्यांच्यापुढं शिवसेनेच्या वतीनं निवडणुकीत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शिवसेनेला यश मिळालं नाही. आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची (KDCC Bank Chairman Election) आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड पार पडणार आहे. आज दुपारी तीन वाजता निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार पी.एन पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तर, उपाध्यक्षपदासाठी आमदार राजीव आवळे आणि श्रुतिका काटकर यांची नाव चर्चेत आहे.

शिवसेनेचं खच्चीकरण करायचं राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही काही नेत्यांची छुपी नीती : योगेश कदम
आकड्यांचा धंदा भाजपचा आहे, किरीट सोमय्यांना कळलं पाहिजे : नवाब मलिक