Breaking | केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नातेवाईक आणि वॉर्डबॉय यांच्यात वाद
रुग्णाच्या नातेवाईकांनी वॉर्ड बॉय आणि सिस्टर यांना उठवण्याचा प्रयत्न केला. अर्धा तासाच्या खटाटोपानंतर प्रतीक नावाचा वॉर्ड बॉय जागा झाला तर नर्सने दरवाजा उघडला. त्यानंतर रुग्णावर उपचार करणं सोडून बिथरलेल्या वॉर्ड बॉयने थेट आनंद यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आलाय. मला चांगली झोप लागलेली असताना मला तू झोपेतून का उठवलं म्हणत वॉर्ड बॉयने रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
केडीएमसीच्या शास्त्री नगर रुग्णालयातील एका व्हायरल व्हिडीयोमुळे रुग्णालयातील गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. पहाटेच्या सुमारास डोंबिवलीत राहणारे आनंद नवसागरे आपल्या वडिलांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना घेऊन शास्त्री नगर रुग्णलयात आले. मात्र शास्त्री नगर रुग्णालयातील इमरजन्सी विभागातील नर्स व वार्ड बॉय साखर झोपेत होते.