Kirit Somaiya : ‘बोजा बिस्तरा तयार ठेवा’, ईडी छापेमारीनंतर सोमय्यांनी परबांना सुनावलं

| Updated on: May 26, 2022 | 11:28 AM

अनिल परब यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय संबंधित व्यक्तीविरुद्ध ईडीने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

मुंबई – अनिल परब (Anil Parab) यांच्यावरती ईडीने (ED) छापेमारी करायला सुरूवात केल्यानंतर किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी अनिल देशमुख आणि नवाब मलिका यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता अनिल परब यांनी आपला बोजा बिस्तरा भरावा असा सल्ला किरीट सोमय्यांनी अनिल परब यांना दिला आहे. त्यामुळे अनिल परब यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय संबंधित व्यक्तीविरुद्ध ईडीने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे अनिल परब यांच्याविरोधात ईडीला सबळ पुरावे मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. ईडीच्या या छाप्यात कोणते नवे पुरावे समोर येतात हे पाहावे लागेल असंही किरीट सोमय्यांनी सांगितले.

Published on: May 26, 2022 11:28 AM
Anil Parab : अनिल परबांवर ईडी कारवाई, परबांच्या कारवाई काय म्हणाले भाजप नेते?
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 26 May 2022